आज रोजी सोन्याचा दर कमी होतोय हे अनेक लोकांच्या लक्षात आलंय. त्यामागे काही महत्त्वाचे आर्थिक आणि जागतिक घटक असतात. चला, समजून घेऊया —
·
सोन्याचा भाव कसा ठरतो?
· सोन्याचा भाव दररोज बदलतो आणि तो ठरवला जातो खालील गोष्टींवर आधारित आहे.
जागतिक बाजारपेठ (International Market):
- लंडन, न्यूयॉर्क यांसारख्या ठिकाणी सोन्याची दररोजची ट्रेडिंग होते.
- डॉलरमधील किंमत (per ounce) ही बेसिक रेट असते.
- भारतात सोनं आयात केलं जातं, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम करतो.
- जर रुपया मजबूत झाला, तर सोनं स्वस्त होऊ शकतं.
- लग्नसराई, सण, गुंतवणूक यामुळे सोन्याची मागणी वाढली की भाव वाढतो.
- कमी मागणी किंवा जास्त पुरवठा असेल तर भाव कमी होतो.
- युद्ध, महागाई, आर्थिक मंदी यामुळे लोक सोन्यात गुंतवणूक करतात, त्यामुळे भाव वाढतो.
- शांततेच्या काळात लोक शेअर बाजारात जास्त गुंतवणूक करतात, त्यामुळे सोन्याची मागणी घटते आणि भाव कमी होतो.
- भारत सरकारने जर आयात कर वाढवले/कमी केले, तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो.
· सोन्याचा भाव का कमी होतो.
पण सामान्यतः:
- डॉलर मजबूत होत असेल,
- शेअर मार्केटमध्ये तेजी असेल,
- मागणी कमी असेल, तर सोन्याचे दर घसरतात.
·
सोन्याच्या
किमतीत असे चढ-उतार होत असतात. भविष्यातील
गुंतवणुकीसाठी हे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरेल.
सद्य स्थितीची माहीती घेऊत -
·
अमेरिकेच्या
शुल्क, जागतिक व्यापार आणि युक्रेन आणि मध्य पूर्वेतील
युद्धांवरून ऐतिहासिक मित्र राष्ट्रांमध्ये
तणाव वाढत असताना, मोठ्या शक्ती यावेळी बुलियनमध्ये
रस निर्माण करणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी
वेगाने एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांचे
म्हणणे आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारांवर लादलेल्या नवीन कर शुल्कामुळे सोन्याच्या किमतीत प्रति औंस ३,००० डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या काही काळात भूराजकीय परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चितता हे सोन्याच्या बाजारपेठेला चालना देणारे प्रमुख घटक आहेत, असे (HSBC) एचएसबीसीचे विश्लेषक जेम्स स्टील यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment