![]() |
वेरूळ |
महाराष्ट्राला पूर्वी 'बॉम्बे प्रेसीडेन्सी' म्हणून ओळखले जातअसे, १ मे, १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.जे १ मे १९६० रोजी भाषिक आधारावर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले.१९६० मध्ये महाराष्ट्राची भाषा मराठी अधिकृत भाषा म्हणून करण्यात आले. २०२४ मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
जगभरात महाराष्ट्र लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व लेण्या खडकात हाताने कोरले आहेत. त्यात प्रमुख औरंगाबाद आजचे छ.संभाजीनगर जिल्ह्य़ातील अजिंठा 115 KM आणि वेरूळ 46 KM आहे. लेण्यांमधील प्राचीन गुहा चित्रे आहेत.लेण्यांमध्ये अजिंठा, कार्ले,कान्हेरी,घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ह्या लेण्यां जगप्रसिद्ध आहेत. ह्या सर्व लेण्यांमधील हाताने कोरलेले प्राचीन भारतीयाचे एक उत्कृष्ट ईंजिनियरीगचा नमुना दिसून येत आहे. बौद्ध लेण्यांची संख्या शेकडोंच्या घरात सर्वाधिक आहे. मुंबईपासून ११ किमी अंतरावर असलेल्या एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून अभिमानाने घोषित केले आहे. प्राचीन बौद्ध कलांचे सर्वात जुने नमुने असलेल्या या दगडी कोरीव लेण्या ईसापूर्व २०० मधील आहेत.ज्याना पुरातत्वीय वास्तुचा अभ्यास करायचा आहे त्यांनी महाराष्ट्राला नक्की भेट द्यावीअजिंठा
No comments:
New comments are not allowed.