Sunday, March 30, 2025

का वापरावा डिजिटल एसएलआर कॅमेरा ..

   


  डिजिटल कॅमेरा हाताळायला सोपा नाही.तुम्हाला हा कॅमेरा हाताळने शिकावे लागेल.भारतात कॅमेरे तयार होत नाहीत.सद्यस्थितीत कोडॅक, याशिका, ऑलम्पस, निकॉन, कॅनन, सोनी या सर्व परदेशी कंपन्यांचे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.

       पूर्वी रोलचे कॅमेरे होते.रोल धुतल्यावरच फोटो चा रिझल्ट दिसायचा.अनेक फोटो काढने खर्चिक,महाग असत.पहीले फिल्म चे रोल आणा, त्यात ३६ ते ४० फोटो निघणार. मग तो रोल धुवायला द्या. त्याची कालीटी चांगली असली तर ठीक,नाहीतर आहे त्यात समाधान मानावे लागत.

       डिजिटल कॅमेऱयात आता तुम्ही वाटेल तेवढे फोटो काढून स्टोअर करू शकता. त्यामुळे हे कॅमेरे लोकप्रिय झाले आहेत. डिजिटल एसएलआर या नावाने हे कॅमेरे ओळखले जातात. जसे हवे आहेत तश्या फिचरस् चे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. यात मायक्रो कार्ड / एस.डी. कार्ड / सी.एस. कार्ड हे तीन कार्ड हवे त्या जीबीचे मेमरी कार्ड वापरता येते,

    

      यात कमीत कमी मेगापिक्सल पासुन पुढे हे कॅमेरे हव्या तेव्हड्या मेगापिक्सल मध्ये उपलब्ध आहेत.

डिजिटल एसएलआर मध्ये तुम्ही एक्स्ट्रा फ्लॅशही लावू शकता.लेन्स चा वापर करुन खूप दुरचे  फोटो काढू शकता, यात तुम्ही कमी प्रकाशात किवा अंधारात फोटो काढू शकता. या कॅमेर्यात काढलेले फोटो  जेपीजी,रॉ फाइल, टिफ फाइल फॉरमॅट मध्ये असतात.या फॉरमॅट मधील फोटोला संगणकावर अधिक चांगल्या प्रकारे डेव्हलप आणि डिझाइन करता येते.

No comments:

Post a Comment

Share Market पैसेच पैसे कमवा

            शेअर बाजार ही एक पैश्यांची देवाणघेवाण यंत्रणा आहे जी गुंतवणूकदारांना सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधील...