डिजिटल कॅमेरा हाताळायला सोपा नाही.तुम्हाला हा कॅमेरा हाताळने शिकावे लागेल.भारतात कॅमेरे तयार होत नाहीत.सद्यस्थितीत कोडॅक, याशिका, ऑलम्पस, निकॉन, कॅनन, सोनी या सर्व परदेशी कंपन्यांचे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.
पूर्वी रोलचे कॅमेरे होते.रोल धुतल्यावरच फोटो चा रिझल्ट दिसायचा.अनेक फोटो काढने खर्चिक,महाग असत.पहीले फिल्म चे रोल आणा, त्यात ३६ ते ४० फोटो निघणार. मग तो रोल धुवायला द्या. त्याची कालीटी चांगली असली तर ठीक,नाहीतर आहे त्यात समाधान मानावे लागत.
डिजिटल कॅमेऱयात आता तुम्ही वाटेल तेवढे फोटो काढून स्टोअर करू शकता. त्यामुळे हे कॅमेरे लोकप्रिय झाले आहेत. डिजिटल एसएलआर या नावाने हे कॅमेरे ओळखले जातात. जसे हवे आहेत तश्या फिचरस् चे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. यात मायक्रो कार्ड / एस.डी. कार्ड / सी.एस. कार्ड हे तीन कार्ड हवे त्या जीबीचे मेमरी कार्ड वापरता येते,